** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 7, 2022

27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 92.28 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 43.74 दलघमी, वारणा 384.44 दलघमी, दूधगंगा 238.68 दलघमी, कासारी 37 दलघमी, कडवी 28.05 दलघमी, कुंभी 36.56 दलघमी, पाटगाव 45.04 दलघमी, चिकोत्रा 20.25 दलघमी, चित्री 19.49 दलघमी, जंगमहट्टी 15.10 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 12.51 दलघमी, आंबेआहोळ 19.95, कोदे -(6.06) लघु प्रकल्प काल दि. 6 जुलै रोजी दुपारी 2.15 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.06 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.9 फूट, इचलकरंजी 57 फूट,  तेरवाड 49.5 फूट, शिरोळ 37.6 फूट, नृसिंहवाडी 32 फूट, राजापूर 23.11 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 11.6  फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.