** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 22, 2019

कोयनेतून 5254 तर अलमट्टीमधून 156407 विसर्ग 9 बंधारे पाण्याखाली



           
कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : कोयनेतून 5254 व अलमट्टीमधून 156407 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 20.2 फूट इंच होती. जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.25 टीएमसी पाणीसाठा आहे.
  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, व शिरोळ हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. दुधगंगा नदीवरील  सुळकूड हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.भोगावती नदीवरील  हळदी हा 1 बंधारा असे एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 121.957  टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104. 83  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.40  टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.76 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.70 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 20.2 फूट, सुर्वे 21.8 फूट, रुई 54 फूट,  तेरवाड 51 फूट, शिरोळ 50 फूट, नृसिंहवाडी 50 फूट, राजापूर 39 फूट तर नजीकच्या सांगली 28.1 फूट आणि अंकली  32.6 फूट अशी आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.