** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 9, 2019

पेडन्यूजबाबत दक्षता घ्या - खर्च निरीक्षक आर. नटेश




कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का) :   विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडून पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारत निवडणूक आयोगाच्या याबाबत असलेल्या सूचनांची काटेकोर अमंलबजवणी करा, अशा सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश यांनी दिल्या.   
खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी आज जिल्हास्तरीय माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची माहिती  घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी कक्षाकडील सोशल मीडिया, पेडन्यूज, सायबर सेल, जाहिरात प्रमाणिकरण, जाहिरात खर्च विषयक कामकाजाची माहिती दिली. सहायक नोडल अधिकारी एस.आर.माने यांनी स्वागत केले.
निवडणुकीतील प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. वृत्तपत्रामध्ये जाहिरातीबरोबरच पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने प्रसारमाध्यम कक्षाने पेडन्यूज प्रकरणाबाबत अधिक दक्ष रहावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जाहिरातीवर देखील  लक्ष ठेवणे गरजचे असल्याचे खर्च निरीक्षक श्री. नटेश  यांनी सांगितले
            यावेळी प्रसार माध्यम कक्षातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव, सहायक प्राध्यापक व्ही.एस.कुंभार, मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, वरिष्ठ लेखा परीक्षक मिलिंद पाटील, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार,  राज्यकर निरीक्षक राजाराम कोळी, राज्यकर निरीक्षक कमलेश तांदळे, राज्यकर निरीक्षक योगेश कुल्लाळ, सायबर तज्ञ अमर अडसुळ, सायबर तज्ञ अनिल बरगे, सांखिकी सहायक किरण देशपांडे, अव्वल कारकून सुरेखा पोळ,  साऊंड रेकॉर्डीस्ट सतीश शेंडगे,  छायाचित्रकार रोहित कांबळे, दुरमुद्रणचालक-नि-टंकलेखक रवींद्रकुमार चव्हाण, सर्वसाधारण सहायक सचिन वाघ, लिपिक-नि-टंकलेखक सतीश कोरे, रघुनाथ कांबळे, अनिल यमकर, प्रकाश कांबळे, रावसाहेब पाटील, साक्षी मोरे, रंगराव मोरे, स्वप्नाली कुंभार, प्रकाश  चव्हाण आणि  मनोज साठे उपस्थ्ति होते.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.