** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 14, 2019

गांधीनगर ते चिंचवाड रस्ता अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश



कोल्हापूर,दि. 14 (जि.मा.का.) : मौजे गांधीनगर ते मौजे चिंचवाड रस्त्याच्या मध्यापासून 47 मीटर अंतरात अनधिकृत झालेली बांधकामे थांबविण्यात आली असून काही व्यक्ती अंतर्गत काम करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. ज्या व्यक्ती न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत त्यांची बांधकामे तात्काळ पाडून टाकावीत व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आलेले आहेत याची संबंधित मिळकत धारकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 0 0 0 0  0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.