** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, October 20, 2019

सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान करावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई




      कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : उद्या सोमवारी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे.
       उद्या सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. हवामान खात्याने उद्या सोमवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी बाहेर पडावे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे. सकाळच्या सत्रामध्ये मतदारांनी मतदान केल्यास दुपारी जरी पाऊस पडला तरी बाधा निर्माण होणार नाही. पावसाचा अंदाज गृहित धरुन जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 0 0 0 0 0 0 0
                  

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.