कोल्हापूर,
दि. 1 (जि.मा.का.) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी
नोंदणी मालिका MH09-FG ही दिनांक 8 ऑक्टोबर पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FH ही बुधवार दिनांक
9 ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दिनांक 9 रोजी सकाळी
10 ते 2.30 या वेळेतच स्विकारण्यात येतील.
लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी
क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी
अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक
आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH
STATE GOVT. ACCOUNT या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला
धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि.
9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 2.30 या वेळेत
आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा.
धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी
केलेली मालिका पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी
एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल.
त्यासाठी अर्जदारांकडून दि. 10 ऑक्टोबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद
लिफाप्यात सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा
जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या
सभागृहात घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी
यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे
आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे,
असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी. अल्वारिस यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.