** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 18, 2019

मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर




        कोल्हापूर दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील 31 मार्च 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
            या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2019. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर  ते मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे  बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असा राहिल.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.