कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत आज
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
घेण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही
शपथ दिली.
आपल्या देशाची आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक
प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार
निर्मूलनासाठी सर्व संबंधित पक्ष जसे की सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्र यांनी
एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.
प्रत्येक नागरिकाने
सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम
मानकाबाबत वचनबध्द असायला हवे आणि
भ्रष्टाचाराविरूध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.
अंतत: मी शपथ घेतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि
कायद्याच्या नियमांचे पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कार्ये
प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन. जनहितामध्ये कार्य करेन. व्यक्तिगत वागणुकीत प्रामाणिकपणा
दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य
एजन्सीला देईन.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी ही शपथ उपस्थितांना दिली.
केवळ शपथ घेण्यापुरती नसून ती सर्वांनी पाळायची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महसूल तहसिलदार सुनीता नेर्लीकर, लाच लुचपत
प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्यासह कर्मचारी तसेच
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.