** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, February 15, 2021

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गी लावावेत -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 




कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आंबेओहोळ, नागनवाडी, दूधगंगा, काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांबाबत एकत्रित यादी द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांबाबत शहानिशा करून जे होणार आहेत ते ताबडतोब मार्गी लावावेत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रातांधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले, डॉ. संपत खिलारी, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम यांच्यासह संबंधित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेवून ते म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईमध्ये बैठक झाली. यामध्ये 65 टक्के रक्कम कपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित काही मागण्यांबाबत पुन्हा शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. प्रकल्पग्रस्तांनी सद्यस्थितीत असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत एकत्रित यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी. याची शहानिशा करून जिल्हाधिकाऱ्यांनी होणारे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावेत. न होणारे प्रश्न शासनाकडे पाठवावेत. त्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही सविस्तर माहिती घेवून प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित प्रलंबित विषयांची यादी देण्याबाबत सांगितले.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.