|
कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती
कार्यालय): मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे दि. 22 मार्च
रोजी मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 114 वी डाक अदालत
आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी
संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे
निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा
तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईलृ विशेषत: टपाल वस्तु/ मनी ऑर्डर/
बचत बँक खाते/ प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारीविचारात घेतल्या जातीलृ
तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास
मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची
आपली तक्रार श्री.एच.एम. मंजेश, सहायक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक
अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा
माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 5 मार्च 2021 पर्यंत अथवा
त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार
नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे. 000000 |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.