** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, February 20, 2021

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची कोल्हापूर चित्रनगरीला भेट

 





कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय)-  सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कोल्हापूर चित्रनगरीला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती घेतली.

 यावेळी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील प्रमुख उपस्थित होते, कोल्हापूर चित्रीकरण सुरू असलेल्या पाटील वाडा, स्टुडिओ कॉम्प्लेक्स, टॉक शो स्टुडिओ या ठिकाणी भेटी दिल्या त्याचबरोबर महेश कोठारे निर्मित स्टार प्रवाह निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी, मेहंदी है रचनेवाली स्टार प्लस वरील या मालिकेच्या चित्रीकरणाच्या स्थळी भेट देऊन उपस्थित निर्माते-दिग्दर्शक व कलाकारांना शुभेच्छा दिल्या, यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी चित्र नगरीमध्ये टप्पा तीन व चार अंतर्गत,  रस्ते, चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध सुविधांच्या गरजांबाबत सविस्तर माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली,

राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी संपूर्ण चित्रनगरीचा फेरफटका मारताना सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना आवश्यक त्या सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना यावेळी दिल्या.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.