कोल्हापूर,
दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन रोजगार
मेळाव्याचे दि. 10 ते 11 फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजन केले असल्याची माहिती
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.
माळी यांनी दिली.
मेळाव्यात शैक्षणिक पात्रतेची
जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांची विविध रिक्तपदांद्वारे सुवर्णसंधी देवू केली
आहे. मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनीच आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्तपदांसाठी आपला
पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारण करीत
असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन कोरोनाच्या
प्रादुर्भावामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ
घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
इच्छुक युवक युवतींनी दि. 10
ते 11 फेब्रुवारी पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. अधिक
माहितीसाठी कौशल्य
विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या दूरध्वनी क्र.
0231-2545677 वर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.