** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 23, 2021

आजअखेर 48 हजार 340 जणांना डिस्चार्ज

 

   कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 139 प्राप्त अहवालापैकी 114 अहवाल निगेटिव्ह तर 14 अहवाल पॉझिटिव्ह (11 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 112 प्राप्त अहवालापैकी 106 अहवाल निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 201 प्राप्त अहवालापैकी 174 निगेटिव्ह तर 27 पॉझीटिव्ह  असे एकूण 47 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 253 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 175 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 47 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, गडहिंग्लज-1, हातकणंगले-2, कागल-1, करवीर-1, पन्हाळा-1, नगरपरिषद क्षेत्र- 3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 32  इतर जिल्हा व राज्यातील – 5 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-887, भुदरगड- 1236, चंदगड- 1228, गडहिंग्लज- 1506, गगनबावडा- 152, हातकणंगले-5325, कागल-1684, करवीर-5732, पन्हाळा- 1871, राधानगरी-1254, शाहूवाडी-1363, शिरोळ- 2512, नगरपरिषद क्षेत्र-7513, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 532 असे एकूण 47 हजार 795 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 458 असे मिळून एकूण 50  हजार 253  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 50 हजार 253 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 340 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 738 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 175 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.