** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, February 1, 2021

नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


 कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कार 2021 करिता इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in  या वेबसाईटवर दि. 3 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम. एस. डी. शिंदे यांनी केले आहे.

महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीकरिता सामाजिक कार्य करणा-या व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांना  केंद्र शासनामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्कारासाठी अर्जदार महिलेचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्षे पूर्ण असावे. महिलेने महिला व बाल विकास, क्रिडा, कला, विज्ञान सांस्कृतिक, इ. क्षेत्रात काम केल्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा.

अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी www.narishaktipuraskar.wcd.gov.in / www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर माहिती पाहुन नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह ऑनलाईन भरण्याच्या सूचनाही महिला बाल कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहेत.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.