कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी
चाचणीचे 834 प्राप्त अहवालापैकी 811 अहवाल निगेटिव्ह तर 3 पॉझीटिव्ह (20 अहवाल
नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 77 प्राप्त अहवालापैकी 77 अहवाल
निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 166 प्राप्त अहवालापैकी 156 निगेटिव्ह तर 10
पॉझीटिव्ह, असे एकूण 13 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 50 हजार 38 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 113 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 13 पॉझीटिव्ह अहवालातील भुदरगड-1, गडहिंग्लज-1
हातकणंगले-2 करवीर-2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 6 क्षेत्रातील व इतर राज्य 1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-886, भुदरगड- 1235,
चंदगड- 1225, गडहिंग्लज- 1499, गगनबावडा- 150, हातकणंगले-5321, कागल-1680,
करवीर-5727, पन्हाळा- 1870, राधानगरी-1252 शाहूवाडी-1359, शिरोळ- 2509, नगरपरिषद
क्षेत्र-7498, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 387 असे एकूण 47
हजार 598 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 2 हजार 440 असे मिळून एकूण 50
हजार 38 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 50 हजार 38 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
48 हजार 196 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 729 जणांचा मृत्यू
झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 113
इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.