** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, February 22, 2021

भुदरगड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीलच्या सरपंच, उपसरपंच निवडीसभा 26 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : भुदरगड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या   सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवार 26 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीची पहिली सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

भुदरगड तालुक्यातील  45 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जानेवारी 2020 मध्ये झाल्या असून, 16 ग्रामपंचायती वगळता 29 ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेतील सरपंच व उपसरपंच निवडवीकरीता  जिल्हाधिकारी देसाई यांनी हे फेर आदेश दिले आहेत. या सभे मध्ये केवळ सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज करण्यात येईल, असे ही आदेशात नमुद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.