** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 13, 2011

नवीन उच्च माध्यमिक शाळांकरिता बृहत आराखडा जाहीर हरकती, आक्षेप, सुचना मागविल्या

         कोल्हापूर दि. १३ : शासनाने दि. २१ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाद्वारे नवीन उच्च माध्यमिक शाळांना कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी देण्याकरिता बृहत आराखडा जाहीर केला आहे. या संदर्भात शासनाने त्यावर जनतेच्या हरकती, आक्षेप, सुचना मागविल्या आहेत.
        उच्च माध्यमिक शाळा संदर्भातील बृहत आराखडा संदर्भात जनतेच्या हरकती, आक्षेप, सुचना असतील तर त्यांनी १९ डिसेंबर २०११ पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करुन त्याची एक प्रत कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे द्यावी. या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०११११२१०५२६००००१ असा आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.