कोल्हापूर दि. २९ : राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी दुपारी ३ वाजता सोनारी येथून खाजगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हेलिपॅडवर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. ३-०५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व शासकीय अधिकार्यांसमवेत चर्चा. ३-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पुरवठा विभागाच्या दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती. ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायं. ६ वाजता बालसंकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे बालसंकुल शिशुगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.