** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 5, 2011

नगरपालिका/नगरपरिषदा निवडणूक क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ लागू

         कोल्हापूर दि. ५ : जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडून नगरपालिका व नगरपरिषद २०११ निवडणूक कार्यक्रम १६ नोव्हेंबर २०११ रोजीपासून जाहीर झाला आहे व त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झालेली आहे. नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या हद्दीतील कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूक निर्भय व न्याय वातावरणात होणे आवश्यक असल्याने हातकणंगले तालुका कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीचे कालवधीत दि. ३ डिसेंबर २०११ रोजीपासून ते दि. ९ डिसेंबर २०११ पर्यत खालीलप्रमाणे आदेश पारीत केलेला आहे.
      कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकार्‍यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकार्‍यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. कोणत्याही व्यक्ती/संस्थेस लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनावर लाऊड स्पिकर लावून घोषणा अगर प्रचार करता येणार नाही. सकाळी ६ पूर्वी व रात्री १० नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. शस्त्र अधिनियम १९५९ खालील धारण केलेल्या कोणत्याही परवाना धारकांना हातकणंगले तालुका हद्दीतील नगरपालिका / नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये आपली हत्यारे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणे तसेच अंगावर बाळगण्यास बंदी आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना (पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना) लागू राहणार नाही. ज्या परवानाधारकांस रुढीप्रमाणे बंदूक डिसप्ले करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. २०११ च्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीचे कालावधीत मोटार गाड्या, वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीनपेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सर्व मोठ्या संरक्षक गाड्यांच्या ताफ्यास तो केंद्ग किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीस घेऊन जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
      निवडणुकीचे कालावधीमध्ये सर्व शासकीय किंवा निमशासकीय व कार्यालयाचे आवारात किंवा शासकीय विश्रामगृहात किंवा इतर अशा कोणत्याही संस्थेच्या आवारात खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
      कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे किंवासभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, निवडणुकीचा प्रचार करणे, तसेच सदरचे बंधन निवडणुकीचे काळामध्ये प्रचार सभा, मेळावे वगैरे कार्यक्रम स्थळी लागू असतील. अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी विना परवानगी बॅनर्स, कटआऊटस वगैरे लावण्याचे नाहीत व पूर्वपरवानगीने लावलेले बॅनर्स, कटआऊटस कार्यक्रम संपताच काढून घेण्याचे आहेत, असेही हातकणंगलेचे कार्यकारी दंडाधिकार्‍यांनी या आदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.