** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 28, 2011

कोल्हापुरात १ जानेवारीला हौसिंग दरबार

         कोल्हापूर दि. २८ : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर व कोल्हापूर शहर आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी व प्रश्नांसंदर्भात निवृत्ती खरेदी विक्री संघ, फुलेवाडी, शालिनी पॅलेस शेजारी, फुलेवाडी रोड,  कोल्हापूर  या  संस्थेच्या सभागृहात १ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ११-३० वाजता हौसिंग दरबार आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व सभासदांनी अडचणीबाबत हौसिंग दरबारमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.