** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 5, 2011

नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. ५ : नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण व माजी सैनिकांचे कल्याण खात्यांचे राज्यमंत्री भास्कर जाधव दि. ६ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ६ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २ वाजता चिपळूणहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व ४ वाजेपर्यंत राखीव. ४ ते ५ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी. ५ वाजता इचलकरंजीकडे प्रयाण. सायं. ५-३० वाजता इचलकरंजी येथे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या इचलकरंजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०११ च्या अनुषंगाने प्रचारार्थ सभेस उपस्थिती. सोयीनुसार चिपळूणकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.