कोल्हापूर दि. ३१ : नाशिक येथील ११६ इन्फंट्री बटालियन (टीए) पॅरा, धोंडी रोड, देवळाली कॅम्प देवळाली या ठिकाणी प्रादेशिक सेनेत सोल्जर जीडी, चिफ (जीडी), क्लार्क, चिफ कम्युनिटी, चिफ मेस, हाऊस किपर, टेलर आणि इक्वीपमेंट रिपेअर या पदासाठी ६ जानेवारी ते ९ जानेवारी २०१२ या कालावधीत भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोल्जर (जीडी) साठी शैक्षणिक पात्रता दहावी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण आहे. चिफ कम्युनिटी, चिफ मेस, टेलर, इक्वीपमेंट रिपेअर या पदासाठी दहावी उत्तीर्ण, टेलरसाठी आयटीआय शिवण आणि कर्तन, इक्वीपमेंट रिपेअरसाठी आयटीआय मॅन्युफॅक्चरर ऑफ फुटवेअर, अशी पात्रता आहे. हाऊस कितपरसाठी ८ वी उत्तीर्ण, क्लार्क स्टाफ ड्युटीजसाठी इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेची इयत्ता बारावी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण, प्रत्येक विषयात ४० टक्के गुण आवश्यक, संगणक आणि टंकलेखनाचे ज्ञान असणार्या उमेदवारांनी लेखी परीक्षेतील गुणांच्या २० टक्के बोनस गुण दिले जातील.
भरतीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांची मूळ आणि छायांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र, एनसीसी/खेळाचे प्रमाणपत्र, अविवाहीत (वय १८ ते २१ वर्ष) दाखला.
तरी पात्र इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.