** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 9, 2012

बुधवारी कोल्हापुरात माजी सैनिक मेळावा

            कोल्हापूर दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध युध्दामध्ये शौर्यपदक प्राप्त वीर पत्नी तसेच माजी सैनिक व अवलंबितांना आर्थिक मदतीचे वाटप तसेच दुसर्‍या जागतिक महायुध्दातील करवीर तालुक्यातील माजी सैनिक, विधवांना दुसर्‍या महायुध्दातील अनुदान फरक आदा करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १४ मार्च २०१२ रोजी सकाळी ११-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.