** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, March 4, 2012

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थांच्या वसतीगृहाचे भूमिपूजन

      कोल्हापूर दि. ३ : येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या वसतीगृहाचे भूमिपूजन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संवाद साधला.
      यावेळी परीक्षा भवन इमारत विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरीचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, अधिष्ठाता डॉ. हरि मोरे, सहअधिष्ठाता डॉ. अशोकराव फरांदे, अभियंता मिलींद ढोके, विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.