** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, March 11, 2012

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त आज डॉ. विलासराव पवार यांचे व्याख्यान

          कोल्हापूर दि. ११ : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विलासराव पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या १२ मार्च २०१२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ताराराणी सभागृहात होईल. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.