** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 16, 2012

वने व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. १६ : राज्याचे वने, पुनर्वसन व मदत कार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम १७ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार दि. १७ मार्च २०१२ रोजी सायं. ५-३० वाजता पलूस, जि. सांगलीहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ६-३० वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरु डॉ. वसंत मारुती चव्हाण यांच्याकडील विवाह समारंभास उपस्थिती. ७ ते ७-४५ वाजेपर्यंत आशीर्वाद बंगला, रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथे माजी खासदार निवेदिता माने यांचे निवासस्थानी राखीव. रात्रौ ७-४५ वा. कोल्हापूरहून सांगलीकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.