** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 20, 2022

राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : राष्ट्रीय  लोक  अदालतीचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली आहे.

          या अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांनी या लोकअदालतीध्ये आपल्या प्रिलिटीगेशनच्या केसेस ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य कागदपत्रासह दि. 1 ऑगस्ट पर्यंत सचिव,‍ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.