** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 13, 2022

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी पेन्शन अदालत निवृत्तीधारकांनी पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा -कोषागार अधिकारी अरुणा हसबे

 

 

            कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार दि. 16 जून रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व निवृत्तीधारकांनी या अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे.

         प्रधान महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी अधिकारी निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. प्रधान महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी कार्यालयाने पेन्शनरांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. जसे साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद, 24 तास उपलब्ध टोल फ्री क्र. 1800-22-0014/24x7 व्हाईस मेल क्र. 020-71177775, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्सकरिता समर्पित ई-मेल helpdesk.mh1.ae@cag.gov.in या उपक्रमांची माहिती देण्यात येईल, असेही श्रीमती हसबे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.