कोल्हापूर, दि. 24
(जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 26 जून रोजी
सकाळी 9 ते 4 या वेळेत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह वसाहतीमध्ये लिम्रास ट्रस्ट व
सी.पी.आर रुग्णालय यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर, ओम हॉस्पिटल यांच्या मार्फत
मोफत डोळे तपासणी व श्री हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत हेल्थ चेकअप, वजन व रक्तदाब
तपासणी, सी.बी.सी., बी.एस.एस. व व्हेरिकोज व्हेन्स शिबीराचे आयोजन करण्यात आले
आहे, अशी माहिती कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी
दिली आहे.
कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणार असून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महानगरपालिका आयुक्त डॉ.
कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,
सी.पी.आर.चे डिन डॉ. दीक्षित, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे,
अति. पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.