** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 10, 2022

बालकांना कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास माहिती कळविण्याचे आवाहन

 


      
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका)  : 12 जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.

       बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे.  मालकाने/ नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास, त्यांना 20 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.

          कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहुपूरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर यांच्याकडे संपर्क साधावा, असेही श्री. गुरव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.