** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, February 5, 2020

परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू



कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.)  : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च  व माध्यमिक शालांत परीक्षा दिनांक 3 मार्च ते 23 मार्च  या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्राच्या आवारात /परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) ज्या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात येणार आहेत त्या केंद्राच्या / उपकेंद्राच्या सभोवार 100 मी. परिसरात दररोज सकाळी 7 वा. पासून सायं. 18 वा. पर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, पेजर व लॅपटॉप वापरावर अप्पर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी बंदी आदेश जारी केला आहे.
हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही.
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.