** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, February 6, 2020

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ देवून पालकमंत्र्यांनी केले राज्यपालांचे स्वागत








        कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.)  :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज विमानतळावर पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राजर्षी शाहू गौरव ग्रंथ देवून स्वागत केले.
            यावेळी उर्वरित महाराष्ट्र  वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आमदार चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांनी पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले. 
            पोलीस दलाच्यावतीने राज्यपालांना यावेळी मानवंदना देण्यात आली.
000000




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.