कोल्हापूर, दि. 25 (जि.मा.का.) : अन्न व औषध प्रशासनाने गुटखा तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम
राबविण्यात आली असून यावर्षी आतापर्यंत 44 लाख 8 हजार 626 रुपयांचा साठा जप्त केला
असल्याचे स्पष्टीकरण अन्न व औषध प्रशासन
विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केले.
जिल्हयात सन 2019-जाने
2020 अखेर 45 कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये 831.04 किलो वजनाचा 44 लाख 8
हजार 626.5 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यापुढेही ही मोहिम अधिक
गतीमान केली जाईल,असेही श्री. केंबळकर यांनी स्पष्ट केले.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.