इंडियन पोस्ट पेमेंट बँक
खात्यासाठी पोस्टाची विशेष मोहीम
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही लोकाभिमुख असून प्रत्येक
व्यक्तीपर्यंत त्याची माहिती पोहचविण्यासाठी डाक विभागामार्फत दिनांक 27 ते 29
फेब्रुवारी 2020 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट
बँकेचे खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवर
अधिक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व जनतेने दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत जवळच्या
पोस्ट ऑफिसमध्ये जावून अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री.
पाटील यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.