कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.) : दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे
समुपदेशन करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे विशेष समुपदेशकांची
नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव
सुरेश आवारी यांनी दिली.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 18
फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 3 ते 23
मार्च या कालावधीत पुणे, नागपूर,
औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय
मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या
काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक
दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी
ऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली
आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
1) 8421741931, 2) 7249005260, 3) 9619248229, 4) 9356056300,
5) 9766698537, 6) 9987318490, 7)
9673121535, 8) 9930638165,
9) 7387501892, 10) 9356089569
परीक्षा
कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीतच भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक विद्यार्थ्यांना
भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी व पालकांनी
परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न इत्यादींबाबत
समुपदेशकांना विचारणा करू नयेत.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.