कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : शासकीय वसतिगृहात प्रवेश पात्र असलेल्या भटक्या जमाती
(क) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा
विद्यार्थ्यांसाठी आदीवासी विकास योजनेच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर नवीन
स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी प्रवेश पात्र
विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 3 मार्च अर्ज पर्यंत
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत.
या
योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या 5 किमी क्षेत्राच्या आत मॅट्रीकोत्तर उच्च शिक्षण
घेत असलेल्या परंतु स्थानिक नसलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार
पेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींना देण्यात येणार आहे. अधिक
माहितीसाठी (दूरध्वनी क्रमांक- 0231-2651318) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,
कोल्हापूर, सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे संपर्क
साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.