कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे कोल्हापूर
विमानतळावर महापौर निलोफर अजरेकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वागत केले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे,
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती
काकडे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे आदि मान्यवर
उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्यावतीने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.