** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, April 7, 2021

इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठीचा ‘तो’ आदेश मागे

 

 


कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मागे घेतला आहे.

परंतु, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी त्याचप्रमाणे अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.