** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, April 14, 2021

आजअखेर 50 हजार 807 जणांना डिस्चार्ज

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2437 प्राप्त अहवालापैकी 2172 अहवाल निगेटिव्ह तर 240 अहवाल पॉझिटिव्ह (25 अहवाल नाकारण्यात आले आहेत).अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 72 प्राप्त अहवालापैकी 54 अहवाल निगेटिव्ह तर 18 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 481 प्राप्त अहवालापैकी 341 निगेटिव्ह तर 130 पॉझीटिव्ह असे एकूण 388 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 9 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 55 हजार 390 पॉझीटिव्हपैकी 50 हजार 807 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2 हजार 746 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 388 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड-4, चंदगड-3, गडहिंग्लज-29, हातकणंगले-28, कागल-10, करवीर-32, पन्हाळा-25, राधानगरी-12, शाहूवाडी-5, शिरोळ-28, नगरपरिषद क्षेत्र-26, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-159, इतर जिल्हा व राज्यातील-19 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-980, भुदरगड- 1337, चंदगड- 1263, गडहिंग्लज- 1684, गगनबावडा- 161, हातकणंगले-5626, कागल-1765, करवीर-6200, पन्हाळा- 2002, राधानगरी-1326, शाहूवाडी-1423, शिरोळ- 2644, नगरपरिषद क्षेत्र-8157, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 17 हजार 931 असे एकूण  52 हजार 499 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 2 हजार 891 असे मिळून एकूण 55  हजार 390  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 55 हजार 390 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 50 हजार 807  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 837 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2 हजार 746 इतकी आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.