** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, April 24, 2021

गडहिंग्लज पंचायत समितीला 25 लाखांचा, तमनाकवाडा ग्रामपंचायतीला 5 लाखाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण

 


 




कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण करून ई-पेमेंटव्दारे पुरस्काराची रक्कम खात्यात जमा केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित असणारे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे, गटविकास अधिकारी शरद मगर यांना तसेच तमनाकवाडाच्या सरपंच अलका साळवी, ग्रामसेवक वासंती मगर यांना पुरस्कार प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.