** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, April 22, 2021

आजअखेर 52 हजार 716 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3065 प्राप्त अहवालापैकी 2615 अहवाल निगेटिव्ह तर 382 अहवाल पॉझिटिव्ह (66 अहवाल नाकारण्यात आले तर 2 अहवाल परत पॉझिटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 640 प्राप्त अहवालापैकी 479 अहवाल निगेटिव्ह तर 161 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 988 प्राप्त अहवालापैकी 710 निगेटिव्ह तर 278 पॉझीटिव्ह असे एकूण 821 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 26 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 60 हजार 221 पॉझीटिव्हपैकी 52 हजार 716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 5518 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 821 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-4, भुदरगड-2, चंदगड-18, गडहिंग्लज-27, हातकणंगले-79, कागल-6,  करवीर-134, पन्हाळा-34, राधानगरी-14, शाहूवाडी-44, शिरोळ-30, नगरपरिषद क्षेत्र-73, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 292, इतर जिल्हा व राज्यातील-64 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1114, भुदरगड- 1451, चंदगड- 1328, गडहिंग्लज- 1836, गगनबावडा- 190, हातकणंगले-6153, कागल-1853, करवीर-6770, पन्हाळा- 2178, राधानगरी-1380, शाहूवाडी-1585, शिरोळ- 2834, नगरपरिषद क्षेत्र-8673, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 19 हजार 642 असे एकूण  56 हजार 987 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 3 हजार 234 असे मिळून एकूण 60 हजार 221  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 60 हजार 221 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 52 हजार 716 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 987 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 5518 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.