** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, April 1, 2021

आजअखेर 49 हजार 566 जणांना डिस्चार्ज

 

   कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1017 प्राप्त अहवालापैकी 965 अहवाल निगेटिव्ह तर 14 अहवाल पॉझिटिव्ह (38 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 166 प्राप्त अहवालापैकी 146 अहवाल निगेटिव्ह तर 20 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 390 प्राप्त अहवालापैकी 302 निगेटिव्ह तर 88 पॉझीटिव्ह  असे एकूण 122 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 52 हजार 182 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 566 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 844 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 122 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2,  हातकणंगले-9, कागल-1, करवीर-16, पन्हाळा- 2, राधानगरी-2,  शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र-31 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 45, इतर जिल्हा व राज्यातील-13 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-916, भुदरगड- 1262, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1563, गगनबावडा- 156, हातकणंगले-5434, कागल-1707, करवीर-5917, पन्हाळा- 1899, राधानगरी-1271, शाहूवाडी-1377, शिरोळ- 2532, नगरपरिषद क्षेत्र-7749, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 490 असे एकूण  49 हजार 508 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 674 असे मिळून एकूण 52  हजार 182 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 52 हजार 182 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 566 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 772 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 844 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.