** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, April 25, 2021

आजअखेर 53 हजार 646 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2711 प्राप्त अहवालापैकी 2163 अहवाल निगेटिव्ह तर 488 अहवाल पॉझिटिव्ह (60 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3085 प्राप्त अहवालापैकी 2854 अहवाल निगेटिव्ह तर 231 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 894 प्राप्त अहवालापैकी 542 निगेटिव्ह तर 352 पॉझीटिव्ह  असे एकूण 1071 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 31 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 63 हजार 74 पॉझीटिव्हपैकी 53 हजार 646 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7358 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1071 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-17, भुदरगड-42,चंदगड-25, गडहिंग्लज-28, गगनबावडा-21, हातकणंगले-120, कागल-31,  करवीर-123, पन्हाळा-76, राधानगरी-8, शाहूवाडी-69, शिरोळ-63, नगरपरिषद क्षेत्र-93, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 291, इतर जिल्हा व राज्यातील-64 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1184, भुदरगड- 1534, चंदगड- 1367, गडहिंग्लज- 1947, गगनबावडा- 220, हातकणंगले-6473, कागल-1911, करवीर-7091, पन्हाळा- 2343, राधानगरी-1424, शाहूवाडी-1697, शिरोळ- 3041, नगरपरिषद क्षेत्र-9020, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 20 हजार 373 असे एकूण  59 हजार 625 आणि इतर जिल्हा व राज्यातील-3 हजार 449 असे मिळून एकूण 63  हजार 74  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 63 हजार 74 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 53 हजार 646 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 70 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7358 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.