** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 19, 2021

आजअखेर 51 हजार 800 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 662 प्राप्त अहवालापैकी 419 अहवाल निगेटिव्ह तर 188 अहवाल पॉझिटिव्ह (55 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 50 प्राप्त अहवालापैकी 21 अहवाल निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 317 प्राप्त अहवालापैकी 103 निगेटिव्ह तर 214 पॉझीटिव्ह  असे एकूण 431 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 34 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 57 हजार 751 पॉझीटिव्हपैकी 51 हजार 800 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4034 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 431 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-7, भुदरगड-2,चंदगड-5 गडहिंग्लज-12,  हातकणंगले-30, कागल-4,  करवीर-41, पन्हाळा-17, राधानगरी-4, शाहूवाडी-11 शिरोळ-41, नगरपरिषद क्षेत्र-37 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 179, इतर जिल्हा व राज्यातील-41 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1050, भुदरगड- 1405, चंदगड- 1294, गडहिंग्लज- 1759, गगनबावडा- 169, हातकणंगले-5835, कागल-1811, करवीर-6463, पन्हाळा- 2089, राधानगरी-1357, शाहूवाडी-1475, शिरोळ- 2747, नगरपरिषद क्षेत्र-8296, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 18 हजार 898 असे एकूण  54 हजार 648 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 3 हजार 103 असे मिळून एकूण 57  हजार 751  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 57 हजार 751 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 51 हजार 800 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 917 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4034 इतकी आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.