कोल्हापूर,
दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर
दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 44 हजार 305
नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 40 हजार 191
हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 20 हजार 302 जणांनी दुसरा डोस घेतला. 50 हजार
775 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 17 हजार 465 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच
60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख
66 हजार 948 नागरिकांनी पहिला डोस तर 25 हजार 310 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 86 हजार 391 नागरिकांनी पहिला डोस तर 57 हजार 342
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 44 हजार 305 जणांनी पहिला डोस तर 1
लाख 20 हजार 419 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.