** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, April 29, 2021

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार-निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय):  कोरोना विषाणूमुळे यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री  सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभास जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.