** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 9, 2021

आजअखेर 50 हजार 180 जणांना डिस्चार्ज

 

 

   कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2315 प्राप्त अहवालापैकी 2048 अहवाल निगेटिव्ह तर 138 अहवाल पॉझिटिव्ह (129 अहवाल नाकारण्यात आले).  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 206 प्राप्त अहवालापैकी 165 अहवाल निगेटिव्ह तर 41 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 488 प्राप्त अहवालापैकी 390 निगेटिव्ह तर 98 पॉझीटिव्ह  असे एकूण 277 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 53 हजार 717 पॉझीटिव्हपैकी 50 हजार 180 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1735 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 277 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-6, चंदगड-4, गगनबावडा-1, हातकणंगले-14, करवीर-17, पन्हाळा-6, राधानगरी-2, शाहूवाडी-3, शिरोळ-16, नगरपरिषद क्षेत्र-51 कोल्हापूर महापालिका क्षेत्र-137, इतर जिल्हा व राज्यातील-18 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-942, भुदरगड- 1310, चंदगड- 1246, गडहिंग्लज- 1594, गगनबावडा- 158, हातकणंगले-5509, कागल-1732, करवीर-6051, पन्हाळा- 1930, राधानगरी-1286 शाहूवाडी-1403, शिरोळ- 2589, नगरपरिषद क्षेत्र-7975, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 17 हजार 174 असे एकूण  50 हजार 899 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 2 हजार 818 असे मिळून एकूण 53  हजार 717  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 53 हजार 717 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 50 हजार 180 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 802 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1735 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.