** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 26, 2021

जिल्ह्यात 8 लाख 13 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 13 हजार 141 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 39 हजार 915 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 19 हजार 806 जणांनी दुसरा डोस घेतला.  48 हजार 243 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 16 हजार 171 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 49 हजार 306 नागरिकांनी पहिला डोस तर 19 हजार 342 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 75 हजार 677 नागरिकांनी पहिला डोस तर 46 हजार 268 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 13 हजार 141 जणांनी पहिला डोस तर  1 लाख 01 हजार 587 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

………

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.