कोल्हापूर,
दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 864 प्राप्त अहवालापैकी 717 अहवाल निगेटिव्ह तर 135 अहवाल
पॉझिटिव्ह (12 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 141 प्राप्त
अहवालापैकी 115 अहवाल निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये
527 प्राप्त अहवालापैकी 400 निगेटिव्ह तर 127 पॉझीटिव्ह असे एकूण 288 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 53 हजार 273 पॉझीटिव्हपैकी 50 हजार 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1464 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 288 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-9, भुदरगड-12, गडहिंग्लज-11,
गगनबावडा-1, हातकणंगले-13, कागल-2, करवीर-24, पन्हाळा-1, राधानगरी-2, शाहूवाडी-2,
शिरोळ-16, नगरपरिषद क्षेत्र-41 कोल्हापूर महापालिका क्षेत्र-127, इतर जिल्हा व
राज्यातील-27 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-940, भुदरगड- 1296,
चंदगड- 1237, गडहिंग्लज- 1593, गगनबावडा- 157, हातकणंगले-5484, कागल-1730, करवीर-6012,
पन्हाळा- 1915, राधानगरी-1280 शाहूवाडी-1396, शिरोळ- 2564, नगरपरिषद क्षेत्र-7910,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 970 असे एकूण
50 हजार 484 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 2 हजार 789 असे मिळून एकूण 53
हजार 273 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 53 हजार 273 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 50
हजार 11 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 798 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1464 इतकी
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.