** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 23, 2021

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पालकमंत्र्याकडून आढावा

 



कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांना त्वरीत उपचारासाठी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे उपस्थित होते.

जिल्ह्यातील रुग्णांलयाची ऑक्सिजनची मागणी जिल्ह्यास होणारा ऑक्सिजन पुरवठा या बाबी विचारात घेऊन कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रस्तरावर पत्र व्यवहार करण्याबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी सूचित केले.

 

ऑक्सिजन टँकच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवा-पालकमंत्री

          जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन टँक बसविण्यात आले आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवा, अशी  सूचना पालकमंत्र्यांनी केली.


  

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.